<
जळगाव- सामूहिक/नोंदणीकृतविवाह करणाऱ्या शेतकरी/शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी शासनामार्फत प्रती जोडपे दहा हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येते. तसेच सामुहीक विवाह आयोजित करणाऱ्या स्वंयसेवीसंस्थेस प्रती जोडप्यामागे दोन हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचा खर्च भागविण्याकरीता देण्यात येते. या योजनेच्या अटी-वधू जळगांव जिल्ह्याची स्थानिक रहिवाशी असावी. शेतकरी असल्यास 7/12 चा उतारा व शेतमजूर असल्यास भूमीहीन शेतमजूर असल्याचा दाखला. उत्पन्नाची मर्यादा- वधूच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखपेक्षा जास्त नाही याबाबतचा उत्पन्नाचा दाखला. नोंदणीकृत विवाह (Registered Marriage) प्रमाणपत्र असावे. सामूहिक विवाह अथवा सरळ विवाह नोंदणीकार्यालयात (Office of the Registrar ofMarriage) जावून नोंदणीकृत विवाह करणारेजोडपे. बाल विवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याचा भंग न केल्याबाबतचे विहित नमुन्यात 20/- रु.च्या स्टॅम्प पेपरवर सक्षम प्राधिकारी यांच्यासमोर केलेले प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. सामुहीक विवाहाचे आयोजन करणारी स्वंयसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहिल. नोंदणीकृत एका स्वंयसेवी संस्थेस एका सोहळ्यात किमान 5 व कमाल 100 जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहिल, याबाबतचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरउपलब्ध करून देण्यात आलेला असून त्याचासंकेतांक क्र. 20111003161557001 असा आहे. अधिक माहिती करीता जिल्हा महिला व बालविकासअधिकारी कार्यालय, दुसरा मजला, मध्यवर्तीप्रशासकीय इमारत, आकाशवाणी केंद्राजवळ,जळगांव येथे संपर्क साधावा. अथवा ईमेल [email protected] वर व फोन नं 0257-2228828 वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.