<
एक कोटी रुपये खर्च करून आधुनिक मार्केट उभारणार
पुणे(अमोल परदेशी)- औंध मधील क्लेरीऑन पार्क सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावरील प्लॉटच्या पाठीमागील दोन नंबरच्या प्लॉटवर आधुनिक मार्केट उभारण्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली आहे. याठिकाणी एक कोटी रुपये खर्च करून आधुनिक मार्केट निर्मिती करणार आहेत व तेथे एकूण ४४ गाळे निर्माण करण्यात येणार आहेत. या मार्केटमध्ये पुणे मनपाकडील पात्र अ, ब, क गटातील अतिक्रमण धारकांचे-फेरीवाल्यांचे पुनर्वसन करून नागरिकांसाठी रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात येणार आहे. या मार्केट संकुलाचे भुमिपूजन नगरसेविका अर्चना ताई मधुकर मुसळे, ॲड. मधुकर मुसळे, तसेच औंध बाणेर प्रभाग समिती अध्यक्षा ज्योतीताई कळमकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी क्लेरिओन पार्क सोसायटीचे चेअरमन कृष्णा कुलकर्णी, श्रीयुत खर्चे, श्रीयुत भोसले, श्रीयुत शेट्टीवार, अतुल चौधरी, राजू लटांबळे, कागणे, डॉ. दहिवले, रोहन कुंभार, मयुर मुंडे, मंगेश घुगे, मंजुषा अनगळ, रूपाली वकणाल्ली, शायनी विजयन आदि उपस्थित होते.