<
जळगांव(प्रतिनिधी)- राज्यातील इंडियन ऑइल चा सर्वात मोठे टर्मिनल असलेल्या पानेवाडी येथील डेपोला आज पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग केंद्रीय कमिटी सदस्य खासदार उन्मेष दादा पाटील यांनी दिली भेट दिली यावेळी आयओसीचे उप महाप्रबंधक हर्षवर्धन यांनी खासदार उन्मेश पाटील यांचे स्वागत केले.पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग केंद्रीय कमिटी सदस्य पदी खासदार उन्मेष दादा पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली होती. त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी माझेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो विश्वास टाकला आहे. त्याला वृद्धिंगत करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन अशी भावना व्यक्त केली होती. आज सकाळी अकरा वाजता पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग केंद्रीय कमिटी सदस्य या नात्याने खासदार उन्मेष दादा पाटील यांनी दिली इंडियन ऑइलच्या पानेवाडी टर्मिनल येथे भेट दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले स्वागतपेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग केंद्रीय कमिटी सदस्य खासदार उन्मेष दादा पाटील यांचे स्वागत करण्यात आले. सुरुवातीला इंडियन ऑइलच्या पानेवाडी युनिटमधील सभागृहात कंपनीच्या अधिकारी सोबत या टर्मिनल मधील कामकाजाची माहिती करून घेतली. याप्रसंगी बिपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल कंपनी चे अधिकारी उपस्थित होते.नव्या टर्मिनल च्या कामाची पाहणीउप महाप्रबंधक हर्षवर्धन यांनी पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग केंद्रीय कमिटी सदस्य खासदार उन्मेष दादा पाटील यांना टर्मिनल परिसरात सुरू असलेल्या नव्या विस्तारित कामाची माहिती दिली. खासदार उन्मेष दादा पाटील यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळांवर जाऊन नवीन युनिटबद्दलची कार्यक्षमता जाणून घेतली. स्वतः केमिकल इंजिनीयर असलेले खासदार पाटील यांनी सखोल माहीती घेतल्याने अधिकारी देखील अचंबीत झाले.यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी उपस्थित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टर्मिनल मध्ये होत असलेले कामकाजाची ओळख करून दिली. तसेच उपमहाप्रबंधक हर्षवर्धन यांनी कंपनीच्या माध्यमातुन भविष्यातील योजनांची माहीती देऊन पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग केंद्रीय कमिटी सदस्य खासदार उन्मेषदादा पाटील यांचे आभार मानले.