<
जळगाव – श्री गुरू माऊली सुपडानंदजी गुरूरेवानंदजी धुनिवाले महाराज यांची ३५ वी पुण्यतिथी दि. २८ नोव्हेंबर गुरूवार रोजी साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने श्री दादाजी दरबार चहार्डी ता. चोपडा, जि. जळगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २७ नोव्हेंबर रोजी सदरगुरू दादाजी महाराज यांच्या नामाची २४ तासाची अखंड नामधुम यापासुन कार्यक्रमाला सुरूवात होणार आाहे.
श्री सदगुरू दादाजी धुनिवाले दादा दरबार चहार्डी येथे २७ नोव्हेंबरला नामधुनने कार्यक्रमास सुरूवात, दि. २८ रोजी सकाळी ५.३० वाजता काकड आरती,६.३० अभिषेक, ७.३० आरती नामधुन, ८.३० नवैद्य अर्पण नामधुन, ९.३० आरती, १०.३० होम हवन, ११ नामधुन, ११.३० आरती, १२.३० भोग अर्पण, १ वा. नामधुन, १.३० भंडारा, २.३० पालखी मिरवणुक,४.३० अभिषेक, आरती, ५.३० हवन, ६ मोठी आरती, रात्री भजन कार्यक्रम.
श्री सदगुरू सुपडानंदजी महाराज यांचा अल्प परिचय
श्री सुपडानंदजी गुरू रेवानंदजी धुनिवाले हे सदगुरू रेवानंदजी महाराज यांच्या आज्ञेने धुनिवाले दादाजी महाराज यांच्या सेवेत होते. श्री सदगुरू दादाजींनी सुपडानंदजी यांच्या मस्तकावर दंड्याने प्रहार करून त्यांना दिव्यात्वाचा साक्षात्कार करून दिला. या कृपाप्रसादाने श्री गुरूमाऊली ने तळगळातील, व्यसनाधिन, अपेक्षीत, आदिवासी यांना पोटाशी लावले व त्यांना श्री सदगुरू दादाजी धुनिवाले यांच्या भक्तीत लावुन व त्यांना सदाचारी मार्गाला लावले. ज्यांचे संसार उध्दवस्त झालेले होते. अंधाारमय जीवन जगणाNयांना त्यांनी प्रकाशत नेवुन जीवन जगण्याची शक्ती दिली. समर्थ गुरू माऊली यांनी संपूर्ण आयुष्य परोपकरात घालविले अशा या महान संताने मार्गशिर्ष व्दितीयाला १९८४ रोजी देह त्याग केला.
कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री धुनिवालाले दादाजी सेवामंडळाच्या विश्वस्थांनी केले आहे.