<
जळगाव.दि.24, जिल्ह्यातील अधिकृत खाजगी ऑटोरिक्षांना परवान्यांवर
नोंदविण्यासाठी 22 सप्टेंबर 2017 च्या अधिसूचनेनुसार खाजगी संवर्गात नोंदणी झालेल्या परिवहन संवर्गात करण्यासाठी 31 मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. तथापि सदर कालावधीत सर्व ऑटोरिक्षा परवान्यावर नोंदणी न झाल्यामुळे गृह विभागाने खाजगी संवर्गातील ऑटोरिक्षा परवान्यांवर नोंदणीसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात दिलेली आहे. खाजगी ऑटोरिक्षा धारकांनी त्यांच्या ऑटोरिक्षा परवान्यांवर नोदणीसाठी पुढीलपैकी कागदपत्रे ,विविध शुल्क, विविह मुदतीत भरावयाचा आहे. विविध शुल्क आणि कागदपत्रे जमा करण्याच्या पध्दती व आवश्यक बाबी पुढीलप्रमाणे असून खाजगी ऑटोरिक्षा धारकांनी परवान्यांवर नोंदणीसाठी त्या सर्व बाबींची पुर्तता करूनच योग्य त्या कागदपत्रांसह उप प्रादेशिक कार्यालयात सादर करावेत.
आवश्यक कागदपत्रे आणि बाबी
1)इरादापत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने रुपये 500चे शुल्क भरून कागदपत्रे
कार्यालयात सादर करावीत 2 अनुज्ञप्ती (लायसन्स), ऑटोरिक्षा बॅज व चारित्र पडताळणी दाखल्यासह कार्यालयात हजर राहून इरादापत्रे प्राप्त करावे 3) बीबीटीआयचे शुल्क 300 चा भरणा करावा, परिवहन संवर्गात नोंदणी करण्यापूर्वी वाहनाचा रंग काळा-पिवळा असणे आवश्यक आहे. त्याबाबत आपले वाहन कार्यालयीन मोटार वाहन निरीक्षक/सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांचेकडून तपासणी करून अहवाल प्राप्त करावा, योग्यता प्रमाणपत्राचे शुल्क रुपये 600 चा भरणा करून वाहन सुस्थितीत असल्याबाबत वाहनाची तांत्रिक तपासणी कार्यालयीन अधिकारी यांचेकडून करून त्यानंतर योग्यता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे 4) वाहनांची नोंदणी केल्यानंतर परवाना मिळेणेसाठी वाहन 4.0 प्रणालीवर पक्का परवान्याकरीता अतिरिक्त शुल्क 10 हजारचा धनादेश कार्यालयात जमा करावा 5) नवीन परवान्यांवर नोंदणी करताना अथवा सध्याच्या परवान्यावर बदली वाहन म्हणून नोंदणी करतांना नियम 75 च्या उपनियम (1) मधील खंड (क) व या नियमाच्या उपनियम (1) मध्ये नमूद केलेल्या
शुल्काव्यतिरिक्त प्रथम नोंदणी दिनांकापासून एका वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असल्यास 1 हजार तर एका वर्षापासून ते चार वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास त्यासाठी अनुक्रमे 2 हजार,3 हजार,4 हजार व 5 हजार एवढा अतिरिक्त शुल्क वसुल करण्यात येईल. जिल्ह्यात अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी ऑटोरिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. या सर्व खाजगी ऑटोरिक्षाधारकांनी त्यांच्या वाहनाकरीता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,जळगाव या कार्यालयातून विहित शुल्क भरून अटी व शर्तीनुसार परवाना प्राप्त करून घ्यावा . अधिक माहिती आणि मार्गदर्शनासठी कार्यालयातील वरिष्ठ लिपीक चंद्रशेखर इंगळे यांच्या 9421144566 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.