<
जामनेर (भागवत सपकाळे) तोंडापुर येथे नापीकीला कंटाळुन ६७ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि २४ रोजी सकाळी उघडकीस आली. तोंडापूर येथील भाऊराव आनंदा अपार याचे तोंडापूर शिवारात चार ते पाच एकर शेतात मेहनत करुन ही वाया गेलेला माल हाती न लागल्याने कर्ज परतफेड कशी करावी या विवचनेतुन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.त्याना एक अपंग मुलगी असुन तीची देखभाल एक मुलाचे लग्न ही बाकी असताना शेतात ही मालाचे नुकसान झाल्याने विहीरीच्या काठावर आपला रुमाल,घड्याळ,वीस रुपयाची नोट आणी पायातील बुट बाजुला ठेऊन उडी घेतली .सकाळी कापूस वेचणीसाठी पाणी काढायला गेलेल्या महीलांच्या हा प्रकार लक्षात आला.
सदर घटनेचा पहुर पोलीसांतर्फे पंचनामा करण्यात आला त्यावेळी पोलीस हवलदार किरण शिंप, नवल हटकर , पो.पा.सुलोचना पाटील, जितेंद्र पाटील, माजी सरपंच सुनिल कालभिले , नाना जाधव, जगन काळे, प्रताप भुतेकर आनंद अपार राम अपार ग्रामस्थ हजर होते. मृतास शव विच्छेदनासाठी जामनेर येथे हलविण्यात आले. रुग्ण वाहीनेकेची तोंडापूरला मागणी. शेतातिल विहिरीतुन मृत झालेल्या शेतकऱ्याचे प्रेत काढण्यात येवून खाजगी वाहनाने गावाकडे आणले मात्र जामनेर येथे नेण्यासाठी कोणतिच गाडीची व्यवस्था नसल्याने काही तास जामनेर येथुन रुग्णवाहीका येत असल्याची माहीती मिळत असल्याने बराच वेळ होऊनही गाडी मिळत नसल्या नागरीकांनी नाराजी व्यक्त केली . जामनेर चे संकटमोचक गिरीष महाजन मात्र सत्ता स्थापनेत व्यस्त असून त्यांच्या मतदारसंघात मृत व्यक्तीचे असे हाल असेल तर सर्वसामान्य माणसाची काय परिस्थिती असू शकते? त्यासाठी तोंडापूर गावासाठी स्वतंञ रुग्णवाहीका मिळावी अशी मागणी होत आहे.