<
जळगाव-पाचोरा विधानसभा मतदारसंघातील पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व पात्र मतदारांना मतदार यादीत नांव समाविष्ट करण्यासाठी आणखी संधी म्हणून 20 व 21 जुलै तसेच दिनांक 27 व 28 जुलै, 2019 रोजी मतदार यादीत नांव समाविष्ट करण्यासाठी विशष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत 18-पाचोरा मतदार संघातील सर्व 322 मतदार केंद्रनिहाय अधिकारी (बीएलओ) दिनांक 20 व 21 आणि 27 व 28 जुलै, 2019 या तारखांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर थांबून संबंधित मतदारांची नावे तसेच ईतर सर्व पात्र मतदारांचे अर्ज क्रमांक 6 भरून घेणार आहेत.अर्ज भरण्यासाठी अर्जदाराचा एक पासपोर्ट साईजचा फोटो आणि दिनांक 1 जानेवारी, 2019 रोजी किंवा तत्पुर्वी वयाची 18 वर्षे पुर्ण केल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. अर्ज निशुल्क पध्दतीने भरता येणार आहे. ज्या मतदारांना ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करावयाची असेल त्यांनी www.nvsp.in या संकेत स्थळाला भेट देवून त्यावरून अर्ज क्रमांक 6 भरावा. या मोहिमेंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी, दिव्यांग मतदार, नवविवाहिता, स्थलांतरीत होवून मतदार संघात कायमस्वरूपी रहिवासासाठी आलेल्या व्यक्ती यांनी विशेष सहभाग नोंदवावा. तसेच सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या बुथ लेवल असिस्टंट (BLA) यांच्या माध्यमातून या मोहिमेची व्यापक प्रसिध्दी देवून जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी सहकार्य करावे. असे आवाहन 18-पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.