<
शहीद विजय मनोरे यांच्या पुतळ्याचे अनावरण
गिरड/पाचोरा(प्रमोद सोनवणे)- देशाच्या सेवेसाठी आयुष्याचे बलिदान करणारे वीर जवान यांच्या शौर्याचे नव्या पिढीला सातत्याने स्मरण व्हावे यासाठी आज शहीद विजय मनोरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. आजच्या तरुण पिढीला देशसेवेचे आकर्षण वाढत असून सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांच्या पाठीशी समाजाने उभे राहवे. यातून शहीद विजय मनोरे सारखे देशसेवक निर्माण होतील हीच खरी वीर जवान विजय मनोरे यांना श्रद्धांजली ठरेल अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. गिरडचे भूमिपुत्र तथा शहीद जवान विजय मनोरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ आज येथे संपन्न झाला. शहीद विजय मनोरे यांच्या पुतळ्याची गावात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती.माजी आमदार सतीश अण्णा पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी सकाळी पुतळ्याचे पूजन केले. तर खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पुतळ्याचे व कोनशिला अनावरण केले. याप्रसंगी पुतळा उभारणीसाठी परीश्रम घेणारे जवान गोपाळ रामकृष्ण पाटील, अनिल शामराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त डिगंबर पाटील, किशोर पाटील तसेच शहीद जवान यांचे माता पिता शालीकराम मनोरे, भिकुबाई मनोरे यांचा सत्कार खासदार उन्मेश पाटील यांनी केला. यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष मच्छीन्द्र पाटील, विलास आमदार पाटील, विजय पाटील, रतीलाल महाजन, भडगाव पं. स. सभापती रामकृष्ण पाटील, सदस्य प्रताप सोनवणे, डॉ.अनंत पाटील, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील, स्नेहा गायकवाड, बाजार समितीचे उप सभापती विश्वास भोसले, सरपंच कोकीळाबाई पाटील, उपसरपंच गुलाब पाटील, मोहन पाटील, माजी जी प सदस्य दिनकर पाटील, सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक रमेश चौधरी, शिवाजी पाटील, पुना पाटील, हभप स्वप्नील महाराज, विश्वासराव पाटील, एम ए पाटील ,चाळीसगाव पं. स. सदस्य भाऊसाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेंन काका जैन सह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.