<
जळगांव(प्रतिनीधी)- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक विभागाच्या वतीने नाशिक आणि अहमदनगर येथील विद्यार्थ्यांसाठी २४ रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृह, शालीमार चौक येथे या बोला ! प्रश्नं मांडा ! स्वंतत्र मत व्यक्त करा ! बिनधास्त ! च्याधर्तीवर “विद्यार्थी संवादचे” आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादसाठी “यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ” नाशिकचे सहाय्यक प्राध्यापक श्री.नागार्जुन मा. वाडेकर, राष्ट्रीय कार्यकारिणी कमिटी युथ प्रोटेक्शन “भारतीय मानवाधिकार परिषदचे अध्यक्ष शरद किसनराव केदारे, दिंडोरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळचे नितीन भुजबळ आणि इगतपुरी बार कौन्सिलचे उपाध्यक ॲड. जितेंद्र शिंदे या सर्व मार्गदर्शकानी “आधुनिक विद्यार्थी चळवळीची महाराष्ट्राला असलेली नितांत गरज” यावर सखोल मार्गदर्शन केले तसेच ह्या विद्यार्थी परिसंवादमधे विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेमधे असलेल्या संवेदनशील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली व उपस्थित विद्यार्थ्यांनी यावर आपले स्वतंत्र मत मांडले ह्या परिसंवाद मधे विविध विद्यार्थी आणि सामाजिक संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदिविला प्रामुख्याने चेतन जाधव, मृनाली दुपारे, रमण नाईक, धीरज वडघर पाटील, निशिकांत तुपलोंडे, शरद आहिरे, भूषण महाजन, अविनाश धोंडे, राहुल बॉक्सर आणि विनय कोठारी यांची उपस्थिती लाभली. आज देशभरातील सर्वसामान्य विद्यार्थी असंख्य अडचणींना सामोरे जात आहे, विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याने त्यांना व्यक्त होण्यासाठी स्वतःच्या हक्काचा विचारमंच उपलब्ध करून देणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो. संपूर्ण देशभर तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाट मोकळी करण्यासाठी आम्ही आमच्या महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या विद्यार्थी संघटनेद्वारे विद्यार्थ्यांसाठी हा हक्काचं विचारमंच प्रदान केलेला आहे आजच्या नाशिकच्या परिसंवादात निर्माण झालेल्या प्रश्नांवर महाराष्ट्र स्टुुडंट्स युनियन ठोस भूमिका घेणार असून प्रशासन आणि शासन याना लवकरच निवेदन देण्यात येतील. असे युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक विभाग प्रमुख सिद्धार्थ तेजाळे आणि त्यांचे सहकारी भूषण महाजन आणि शरद अहिरे यांनी हा परिसंवाद यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.भारतीय राज्यघटनेची प्रस्तावनेचे वाचन नाशिक विभाग प्रमुख सिद्धार्थ तेजाळे यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात केली व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि भारतीय राष्ट्रगीत गाऊन विद्यार्थी संवाद कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली. युनियनचे उपाध्यक्ष सुनिल देवरे आणि सहसचिव प्रशांत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.अरुण चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.