<
विद्यार्थ्यांना संविधान बाबत माहिती असणे गरजेचे- सौ कल्पना वसाने
जळगांव(प्रतिनीधी)- येथील सरस्वती विद्या मंदिर येथे आज २६ नोव्हेंबर सविंधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्व प्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापिका सौ कल्पना वसाणे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण केले. यावेळी संविधान सादर या क्षणाची आठवण म्हणून विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या वेशभूषेत असलेला चेतन सपकाळे याने भारताचे सविंधनाचे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशभूषेत असलेला दर्शन चौधरी यांच्या हाती सोपविले तसेच. या वेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. संविधान बाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली व संविधानाची प्रतिज्ञा घेण्यात आली. या उपक्रमाला प्रोत्साहन संस्थेचे अध्यक्ष व ग.स .चे अध्यक्ष मनोज पाटील यांचे लाभले. सुत्रसंचलन सोनाली गवळी यांनी केले. मार्गदर्शन सुदर्शन पाटील व वैशाली पाटील यांनी केले. अस्मिता चिंचोलीकर यांनी भिमगीत सादर केले. उपक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी केले. तर सहकार्य विनय गायकवाड, नीलिमा भारंबे, उज्वला ब्रम्हणकर, तसेच सर्व छात्र अध्यपाक यांचे लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी २६ नोव्हेंबर मुंबई येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाना श्रद्धांजली वाहण्यात आली.