<
जळगाव (प्रतिनिधी)- येथील बागवान विकास फौंडेशन व अमन रोटरी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार,२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मेहरुण भागातील गणेशपुरी मधील फौंडेशनच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.या निमित्ताने फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. शरीफ बागवान यांनी संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून संविधानाच्या बांधिलकीची शपथ देण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सामाजिक कार्यकर्ते अशफाक पिंजारी यांनी संविधानातील मुलभूत तत्वांची माहिती देऊन त्यांनी पुढे सांगितले की,भारतीय संविधान परिपूर्ण असून जगातील एक आदर्श राज्यघटना आहे. यावेळी अश्रफ खान, मेजर शफी पटवे, डॉ. अल्तमश हसन, हाजी युसूफ शेख, बरकत खाटीक, समीर सलीम, फिरोज शेख, शाहीद खान, फरहान शरीफ, अमान खान आदी उपस्थित होते.