<
सजग नागरिक मंचच्या वतीने भूमी अभिलेख शाखेच्या जिल्हा अधीक्षकांना दिले निवेदन
पुणे(अमोल परदेशी)- उप अधीक्षक भुमिअभिलेख तालुका खेड जिल्हा पुणे येथील कार्यालयात सेवा हमी कायदा धाब्यावर बसून कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांची सर्रासपणे लुट होत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात सुरू असलेल्या लुटीची तक्रार जिल्हा अधिक्षक भुमीअभिलेख यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच भुमीअभिलेख कार्यालयात सामान्य नागरिकांना येणाऱ्या अनुभवाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्याची दखल घेण्यासाठी सजग नागरिक मंच तर्फे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांना निवेदन देण्यात आले आहे. या कार्यालयातील भोंगळ कारभाराबाबत अनेक सामान्य नागरिकांच्या तक्रारी येत होत्या, मात्र कुणावरही कारवाई झालेली नव्हती व परिस्थिती “जैसे थे” दिसून येत होती. यासंदर्भात कार्यालयातील दोषींवर तात्काळ कारवाई करण्यासाठी सजग नागरिक मंचच्या वतीने आज जिल्हा अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. तसेच कार्यालयातील या सर्व गोष्टीं मागे काही वरिष्ठांचा देखील हात आहे का? अशी शंका या ठिकाणी उपस्थित केली जात आहे.