<
महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन
जळगांव(प्रतिनीधी)- आपल्या प्रेरणादायी कार्याने इतरांना दिशा देण्याचे काम प्रत्येक क्षेत्रात अनेकांकडून सातत्याने होत असून, ही बाब लक्षात घेऊन व अंधारातील दिव्यांना प्रकाशाच्या ज्योतीने प्रज्वलित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, आपापल्या क्षेत्रात सेवाभावी वृत्ती जोपासणाऱ्या उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव तसेच राज्यशासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर यांनी दिली. दिनांक २८ नोवेंबर २०१९ म्हणजे आजपासून सदर प्रस्ताव सादर करावयाचे असून १०डिसेंबर २०१९पर्यंत आदर्श शेतकरी, आदर्श जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक, संस्थांचे माध्यमिक शिक्षक, खाजगी प्राथमिक शिक्षक, स्वयसेवी संस्था, संघटना, अल्पसंख्याक शाळा व क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, पत्रकार, समाजसेवक, उद्योजक, साहित्यिक,शासनाच्या तेजस प्रकल्पांतर्गत कार्य करणारे टॅग कॉर्डिनेटर, केंद्रप्रमुख शिक्षण विस्ताराधिकारी, पोलिस व संरक्षण विभाग, ग्रामसेवक, सरपंच या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील आलेल्या प्रस्तावामधून प्रत्येक क्षेत्रातून एकाची निवड निवड समितीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक तथा सन्मान सोहळ्याचे आयोजक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. तसेच दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्याचे नियोजन असून संबंधितांनी आपले प्रस्ताव हे कारगिल रेस्टॉरंट, देशपांडे मार्केट, बसस्थानकाजवळ जळगाव, तसेच किशोर पाटील कुंझरकर,५३अ, क्षितिज निवास चिमुकले दत्त मंदिराजवळ आदर्श नगर एरंडोल तालुका एरंडोल जिल्हा जळगाव. पिन 425109. मोबाईल नंबर ७०३०८८९० या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वतः स्वहस्ते विहित नमुन्यात पाठवावे. आपले शैक्षणिक सामाजिक कार्य त्याच जोडीने उल्लेखनीय कार्याची एक प्रत स्वहस्ताक्षरात प्रस्तावना जोडायची असून संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक राहणार आहे. प्रत्येक क्षेत्रातील पुरस्काराचे नाव वेगवेगळे राहणार असून आयोजक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ आहे.विविध कात्रणे जोडून परिपूर्ण प्रस्ताव पाठवावे. जळगाव जिल्ह्यासह जिल्हास्तरीय सोहळा असून इतर कोणत्याही जिल्ह्यातून आलेले प्रस्ताव स्वीकारण्यात येतील. तरी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन यावेळी संयोजकांच्या वतीने करण्यात आले असून, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम सातत्याने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्यावतीने राज्य समन्वय समितीच्या व सर्व क्षेत्रातील मित्र परिवाराच्या सहकार्य व मदतीने राबविण्याचा मनोदय यावेळी शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी व्यक्त केला.