<
जळगाव(प्रतिनीधी)- संविधान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेला वंदन करून प्रगती विद्यामंदिर येथे ‘ओळख संविधानाची’ उपक्रम घेण्यात आला.विद्यार्थाना संविधानाची ओळख व्हावी म्हणून शिक्षक मनोज भालेराव यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. देशाचा राज्यकारभार सुरळीत व व्यवस्थित चालावा यासाठी काही नियम व संकेत असने गरजेचे असते याविषयीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपने ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. याविषयी जनजागृति व् अधिक माहिती मिळावी म्हणून विद्यार्थाना या उपक्रमान्तर्गत संविधानाची प्रत दाखविन्यात आली व संविधानाची प्रस्तावना म्हणजेच उद्देशिका वाचून दाखवत त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रस्तावनेतील ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दाविषयीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. विद्यार्थ्यानी संविधाना विषयी माहिती आपल्या भाषणातून सांगितले.