<
शिरपूर (धर्मेश पालवे)-धुळे ते शिरपूर येथील नेशनल हायवे नंबर तीन वर असणारे मोठं मोठी खड्डे वाचवून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे पाहता धुळे जिल्हा जागृत जन मंच च्या डॉ सरोज पाटील यांनी आपल्या आंदोलक पद्धतीने मौत का कुवा असनारे आणि वारंवार सांगूनही न भरणारे खड्डे पुन्हा भरून सुव्यवस्थित करावे यासाठी आंदोलन केले. रस्त्यावर जाणारी जनता रोड टॅक्स भरत असून सुविधा मात्र जीवघेणारी आहे याकडे रस्ते प्रशासन व सद्भावना टोल कंपनी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहता जो पर्यंत ही खड्डे बुजवली जात नाही तो पर्यंत रस्यावरील कोणतेही वाहन रस्ता टेक्स भरणार नाही अशी भूमिका घेत सदर टोल वर डॉ सरोज पाटील यांनी तेथील प्रशासन व कंपनीस धारेवर धरले. त्याच बरोबर जर हे लक्षात आणून दिल्यावर ही खड्डे बुजवली गेली नाही ,किंवा रस्ता टेक्स वसुली थांबवली नाही तर धुळे जिल्हा जागृत जन मंच व येथील नागरिक या बाबत रस्ते परिवाहन मंत्रालयाकडे आंदोलन करेन असे हो डॉ सरोज पाटील म्हणाल्या. सदर सत्याच्या टोल विषयी अनेकदा तक्रारी येत होत्या, त्याच बरोबर आता टोल नाक्या समोरच मोठं मोठी खड्डी पडली असून त्यात एखाद्या चा जीव गेल्यावरच या प्रशासनाला अथवा टोल कँपणीला जाग येईल का असा प्रश्न ही या आदोलनच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. शहरात या आंदोलनाची दिवस भर चर्चा सुरू होती.