<
पत्रकार परिषदेत डॉ. श्रद्धा माळी यांनी दिली माहिती
जळगाव-(प्रतिनीधी)- माधवबाग कार्डिअँक क्लिनिक व सोहम डिपार्टमेंट आँफ योग अँड नँचरोपँथी यांच्या संयुक्त विद्यमाने आँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी किंवा बायपास झालेल्या व्यक्तीसाठी हदयरोग निदान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. माधवबागचे हदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत याकुंडी व श्री मिलिंद सरदार हे रूग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. सदरची कार्यशाळा दिनांक ३०नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२वाजे दरम्यान एम.जे.महाविद्यालयाच्या जुन्या काँन्फरन्स हाँलमध्ये होणार आहे. ब्लॉकेजेस म्हणजे नक्की काय व ते कसे तयार होतात, ब्लाँकेजेस असताना आहार व व्यायाम काय असावा, ब्लाँकेजेसमुळे हार्ट अटँक येतो का? अशा विविध प्रश्नांची उकल या कार्यशाळेत करण्यात येणार आहे.याशिवाय घसघशीत सवलतीच्या दरात ‘ह्रदय रोग निवारण प्लँन’ मध्ये नोंदणी करण्याची संधी कार्यक्रम स्थळी उपलब्ध असणार आहे. माधवबाग हे जगातील पहिले आयुर्वेदीक हदयरोग निवारण केंद्र आहे. आतापर्यंत पाच लाखाहून अधिक रुग्णावर माधवबाग तर्फे यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी देशभरात माधवबाग ची १९० हुन अधिक क्लिनिक्स व ५दिवसाच्या निवासी चिकित्सेची २ हाँस्पिटल्स रुग्ण सेवेत कार्यरत आहेत. कार्यशाळेत हदयासंबधित तपासण्या सवलतीच्या दरात करण्यासाठीचे कुपन्स उपलब्ध असणार आहेत. या कार्यशाळेचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. असे आवाहन माधवबाग परिवारकडुन करण्यात आले आहे.