<
अमोल परदेशी यांनी दिले अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन
पुणे(अमोल परदेशी)- खेड तहसील कार्यालयात सेवा हमी कायदा धाब्यावर बसवत तहसील आणि तलाठी कार्यालयात नागरिकांच्या सर्रासपणे सुरू असलेल्या लुटेची गंभीर दखल घेणे गरजेचे झाले आहे. कार्यालयामध्ये येणाऱ्या अनुभवाबाबत नागरिकांकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे, त्याची दखल घेण्यासाठी अमोल परदेशी यांच्याकडून अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. खेड तहसील कार्यालय आणि त्या अंतर्गत येणाऱ्या तलाठी कार्यालयात गैर कारभाराला आळा बसवणे गरजेचे झाले आहे. नागरिकांच्या अनेक महिने वारस नोंदी घेतल्या जात नसल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत, या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी पथक नेमण्यात यावी व दोषींवर नियमानुसार दप्तर दिरंगाई ची कारवाई व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.