<
मुंबई-विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे. अशा प्रकारे महाविकास आघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले आहे. हा ठऱाव मांडत असताना विरोधी पक्ष भाजपने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. गोंधळ सुरु असतानाही ठाकरे सरकारच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे. 169 मते ठाकरे यांच्या बाजूने पडली. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे, असा प्रस्ताव अशोक चव्हाण यांनी मांडला. यास अनुमोदन नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील यांनी अनुमोदन दिले. भाजप आमदारांनी बहुमत सिद्ध करताना सभागृहातून सभात्याग करत महाविकास आघाडीच्या विरोधात घेषणा बाजी केली.