<
जळगाव – जळगाव जिल्हा पोलिस दलात पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विनोद पितांबर अहिरे यांचा आज दिनांक 1डिसेंबर रोजी चाळिसावा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी 40 किलोमीटर सेटिंग करून एक अनोखा विक्रम केला असून वयाच्या चाळीसाव्या वर्षी 40 किलोमीटर स्केटीग करणारे देशातील पहिले पोलीस कर्मचारी असल्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.
आज सकाळी 10 वाजता बहिणाबाई उद्यान येथे सदरचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे, नरेश बागडे,मुकुंद सपकाळे, फारुक शेख, प्रकाश बोरसे, विनोद देशमुख, प्रवीण पाटील,दिलीप सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले आपल्या मनोगतात विनोद अहिरे म्हणाले की, समाजामध्ये पोलिसांबद्दल असा समज निर्माण झाला आहे की, पोलीस दलात भरती झाल्यावर पोलीस काही वर्षातच स्थूल होऊन जातात त्यांचं पोट बाहेर येऊन जातं त्यांच्याकडून धावले जात नाही, वर्तमानपत्र असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना जर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पोलिसांची प्रतिमा दाखवायचे असेल तर एक पोट सुटलेला पोलीस पाठीच्या कण्यातून वाकलेला पोलीस अशी प्रतिमा त्यांची दाखवली जाते या कल्पनेला छेद द्यावा म्हणून माझ्याकडून हा छोटासा प्रयत्न आहे आणि निवृत्तीपर्यंत दरवर्षी ते करत राहील. ते पुढे म्हणाले की जीवनातील प्रत्येक वादळ आपल्याला संपवण्यासाठी येतं असं नव्हे तर आपण काय आहोत आपल्या क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी येत असतं त्याकरिता संघटन मुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती ही आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी चालून आलेली एक संधी असते. त्याकरिता संकटांवर असे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. असे मनोगत विनोद अहिरे यांनी केले त्यानंतर फारुक शेख व इतर मान्यवरांची मनोगते झाली त्यानंतर खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी विनोद अहिरे यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. विनोद अहिरे महामार्गावर सलग चाळीस किलोमीटर स्केटिंग करणार होते परंतु महामार्गाचे काम सुरू असल्याने ते शक्य नाही म्हणून बहिणाबाई गार्डनच्या पाचशे मीटर सिमेंट वॉकिंग ट्रॅकवर त्यांना ८० राऊंड मारायचे पण त्यांनी 91 मारले ते अंतर त्यांनी दोन तास सात मिनिट पूर्ण केले सदर प्रसंगी विनोद अहिरे यांचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम पॅंथर स्पोर्ट्स क्लब तर्फे स्केटिंग खेळाडूंनी आयोजित केला होता.