Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभातफेरी संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – येथील जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण केंद्रामार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित प्रभातफेरीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जे. सानप यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे कुलगुरु पी. पी. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय परदेशी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव श्री. ठोंबरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांचेसह विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.
जागतिक एड्स सप्ताहानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरु श्री. पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून या सप्ताहास सुरुवात करण्यात आली. एड्स प्रतिबंध व निमुर्लन व्हावे, याकरीता नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दिशा फाउंडेशनचे विनोद ढगे यांच्या चमूने पथनाट्य सादर केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित प्रभातफेरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नर्सिंगच्या विद्यार्थीनी, गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व इतर विविध महाविद्यालय, शाळांचे विद्यार्थी , सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव येथील डॉ.डी.पी.पाटील सोलापुर येथे पुरस्कारांने सन्मानित

Next Post

रत्नमाला विरेश पाटील यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कडून पीएचडी पदवी प्रदान

Next Post
रत्नमाला विरेश पाटील यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कडून पीएचडी पदवी प्रदान

रत्नमाला विरेश पाटील यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कडून पीएचडी पदवी प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo