<
लोहारा/पाचोरा(प्रमोद सोनवणे)- येथील डॉ जे जी पंडीत माध्यमिक विद्यालयातील आणि शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव गरुड महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, समाज सेवक, समाज भुषण, समाज गौरव, खान्देशभुषण,समाज साथ, समाज मिञ तसेच पुण्यात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित आणि मुंबई विभागातील तक्षशिला विद्यालय महाविद्यालयातील सहशिक्षक अर्जुन रामचंद्र भोई यांना महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीत अर्थात नागपुर शहरात एक डिसेंबर रोजी भोईगौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्जुनभोई यांनी आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या समाजसेवेच्या प्रबोधनात्मक कामगिरीवर नागपुरातुन प्रसिद्ध होणारे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण भोई समाजाच्या घराघरात पोहोचलेले सामाजिक मासिक अर्थात भोईगौरव या मासिकाने त्यांच्या आज पर्यंतच्या केलेल्या सामाजिक सेवेच्या कामगिरीची दखल घेतली आणि त्यांना समाज पटलावरुन आणि वृत्तपञाच्या पातळीवरुन नागपुरात सन्मानित करण्यात आले. आज पर्यंत अर्जुनभोई यांना विविध ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे त्यामुळे त्यांनी आपल्या लोहारा शेंदुर्णी आणि मुबई विभागातील विद्यालय व महाविद्यालयाचा ठसा विविध ठिकाणी उमटविला आहे त्यात दिल्ली, चेन्नई, जयपुर, अजमेर, शिवपुरी, झाँसी, हैद्राबाद, पणजी, अहमदाबाद, मुंबई, पुणे, लातुर, धुळे, भिवंडी, जळगांव, बीड, अमरावती, शिर्डी इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. त्यातुनच एक डिसेंबर रोजी नागपुरात लोहारा शेंदुर्णी मातृभूमिच्या कार्याचा जाहीर सत्कार करण्यात आला. गाव परिसरातील लोहारा येथील डॉ जे जी पंडीत माध्यमिक विद्यालयातील आणि शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव गरुड महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत. लोहारा शेंदुर्णी परिसरातील समस्त नगर वाशियांच्या आशीर्वादचीच त्यांना पोहोचपावती मिळत आहे, तसेच लोहारा, कळमसरा, शेंदुर्णी, सोयगाव, पहुर, पाळधी, नेरी, जामनेर, सिंगाईत, वरखेडी, पाचोरा, जळगांव येथील जनतेच्या पाठींब्याचाच आशीर्वाद असल्याचे ही त्यांनी नमुद केले.