<
जळगाव येथील संतप्त तरुणाईचे जिल्हाधिकारींना निवेदन
जळगाव – हैद्राबाद येथील क्रुर घटनेतील आरोपीना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच महिला व युवतींसाठी स्वतंत्र सुरक्षा कमिटी स्थापन करण्यात यावी यासाठी आज जळगाव येथे अपर जिल्हाधिकारी श्री. नंदकुमार बेडसे सर यांना निवेदन देण्यात आले.
हैद्राबाद येथील डॉ प्रियंका रेड्डी रात्री नऊ ते दहा च्या दरम्यान घरी येतांना त्यांच्यावर अमानुष अत्याचार करून जिवंत जाळले.हा प्रकार अतिशय घृणास्पद व माणुसकीला काळीमा फासणारा आहे.
देशाला स्वतंत्र्य मिळून ७० वर्ष झाली तरीदेखील देशातील युवती व महिला स्वतंत्र्य विहार करू शकत नाही,ती सुरक्षित नाही त्यासाठी देशातील सर्व महिला व युवतींसाठी प्रशासनाकडून कडक कायदे करण्यात यावे तसेच भविष्यात अशा गोष्टी घडणार नाही यासाठी महिला व युवतींसाठी स्वातंत्र्य सुरक्षा कमिटी स्थापन करण्यात यावी. कृपया सदर निवेदन महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्र्यालयाद्वारे संबंधित राज्य शासनाकडे सादर करण्यात यावे,यासाठी संतप्त झालेल्या तरुणाईने नुकतेच जिल्हाधिकारींना निवेदन दिले.तसेच वरील घटनेतील आरोपीना फाशीची शिक्षा करून या प्रकरणाची त्वरित सुनावणी करून तरुणीला न्याय द्यावा,अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.
यावेळी पल्लवी शेवाळे,मानसी धोंडगे, ऐश्वर्या पाटील, दिव्या पाटील या युवती तर परीस कोळी, श्रीहरी सोनार, रोहित सोनवणे, इरफान पिंजारी, मोसीन शेख आदी उपस्थित होते.