<
जळगाव- श्री सद्गुरू दादाजी धुनिवाले महाराज खंडवा मध्यप्रदेश यांच्या वार्षिक उत्सवानिमित्त दि. ९ डिसेंबर सोमवार रोजी सकाळी ९ वाजता मंगल कलश भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सावाला श्री दादाजी विजयग्रंथ पारायणाने सुरूवात करण्यात आली आहे.
श्री धुनिवाले दादाजी यांचा अल्पपरिचय श्री सद्गुरू दादाजी धुनिवाले महाराज हे मध्यप्रदेशातील नरसिंगपुर जिल्ह्यातील गाडरवाडा जवळील साईखेडा या गावी श्री नर्मदा बालक रूपात प्रगट झाले. या घटनेला आज १५० वर्ष पुर्ण होत आहे. श्री नर्मदा परिक्रमावासी श्री जमातवाले बाबा श्री गौरीशंकर महाराज यांच्या साधुसंतांच्या जमातीत श्री दादाजी धुनिवाले महाराज यांनी वास्तव्य केले. जमात मधील साधुसंताना श्री दादाजी महाराज योगाभ्यास, योगक्रिया, विद्या, अध्यात्मिक ज्ञान प्रदान करीत होते. शिवपुराण या गं्रथात महादेव शंकराने केलेल्या लिलांचा उल्लेख आहे. याच लिाल महादेवासारख्या श्री दादाजी महाराज यांनी दिव्य अनुभव देवून तसेच विज्ञानाला चक्रावुन टाकणारे लिला साईखेडा गावात केल्या आहेत. पारा पिणे तो शरीरात तीन /चार दिवस ठेवणे परत जसाचा तसा काढून बाहेर पेâकणे यासारखे दिव्य अनुभव श्री दादाजी यांनी भक्तांना दिले आहे.
कार्यक्रम रूपरेषा खेडी येथील दरबारात सर्व कार्यमक्रम साजरे होणार आहेत. दि. १ डिसेंबर पासुन श्री दादाजी विजय गं्रथ पारायणास सुरूवात करण्यात आली आहे. ५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता पोलनपेठ येथील श्री दादाजी सत्संग वेंâद्रात भजन कार्यक्रम होईल. ७ डिसेंबर रोजी खेडी दरबारात २४ तासाची अखंड नामधून होणार आहे. ९ डिसेंबर रोजी मंगलकलश भव्य शोभा यात्रेला सुरूवात होईल. शोभायात्रा सिटीबस स्थानक मागील पोलन पेठ येथील श्री दादाजी सत्संग वेंâद्रापासुन सकाळी ९ वाजता निघणार आहे. शोभायात्रेत महिलांनी स्वतःचा मंगल कलश सोबत आणावा. शोभायात्रा सिटीबस स्थानक, दाणाबाजार, सुभाष चौक, रथचौक, पांझरापोळ टाकी, जुना नशिरााद रस्त्याने हायवेने खेडीकडे मार्गस्थ होईल. दुपारी १ वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. १३ रोजी नर्मदा निवासी संत श्री छोटे सरकार यांचे सकाळी ९ वाजता श्री दादाजी दरबार खेडी येथे आगमन होणार आहे. तसेच ते भक्तांशी वार्तालाभ करणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हरिहर नित्यसेवा मंडळ संचालीत श्री दादा दरबाराच्या आयोजकांनी केले आहे.