<
जळगाव-(प्रतिनिधी) – जिल्हा परीसरात महसूल प्रशासनाकडून वाळू, गौण खनिजाचे लिलाव झाले नसताना अवैध वाळू वाहतुक मोठया प्रमाणावर केली जात आहे. आज दुपारी दिड वाजेच्या सुमारास मोहाडी रोड गायत्रीनगर परीसरात अवैध वाळू वाहतुक करतांना आढळून आल्याने टॅ्रक्टर क्रमांक एमएच १९ सीबी ३५३८ या वाहनासह तीन टक्ट्रर जप्त करण्यात आले .
या अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी कडक कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. प्रांताधिकारी दिपमाला चौरे, तहसिलदार वैशाली हिंगे यांच्या मार्गदर्शन व सूचनानुसार जळगाव मंडळ अधिकार्यांनी आज ५ डिसेंबर रोजी दुपारी मंडळ अधिकारी यांच्यासह सर्व मंडळ अधिकारी व पो.कॉ.हितेश महाजन यांच्या पथकाला विनापरवाना वाळू वाहतुक करतांना ट्रॅक्टर क्रमांक एमएच१९-सीबी ३५३८ हे गायत्रीनगर मोहाडी रोड परीसरात आढळून आल्याने जागीच कारवाई करण्यात येवून जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्हापेठ पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. यापुढे देखील अशिच कारवाईची मोहीम राबविण्यात आल्यास अवैैैध वाळू वाहतुकीस आळा बसेल असे सुज्ञ जळगांव करामध्ये चर्चा जोर धरू लागली आहे.