<
हैद्राबाद – येथिल बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा मृत्यू झाला. तेलंगणा पोलिसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटर केला. पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं, त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी चारही जणांचा खात्मा केला. हैदराबाद पोलिस आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चारही आरोपी दहा दिवसांच्या पोलिस कोठडीत होते. 4 डिसेंबर रोजी या खटल्यात लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापनाही केली होती. शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरीफ असं चारही आरोपींची नावं आहेत. चारही आरोपी दहा दिवसांच्या पोलिस कोठडीत होते.
घटनेचं रिकंस्ट्रक्शन म्हणजे नेमके काय?
प्रकरणाचा तपास आणि पुरावे मिळविण्यासाठी पोलिस घटनास्थळी जाऊन ‘ती घटना कशी घडली’ यासाठी घटनेचं रिकंस्ट्रक्शन करतात. घटनास्थळी आरोपींनाही नेलं जातं, जेणेकरुन ते आपल्या कृत्याचा पाढा वाचतील. पोलिस हे यासाठी करतात जेणेकरुन त्यांच्याकडून खटला आणखी मजबूत होईल आणि कोर्टात प्रकरणाशी संबंधित सर्व बाबी मांडू शकतील.