<
जळगांव(प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिर शिव कॉलनी येथे ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना वसाने यांचा हस्ते माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अस्मिता तायडे, वैशाली पाटील, मनीषा भावले यांनी भीमगित सादर केले. तसेच शिवप्रिया गवळी, अमोल पाटील, ऐश्वर्या बारी, भविका सोनगडा, दर्शन चौधरी, मीनाक्षी जाधव, अंजली बागुल, यामिनी पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्या बाबत मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांनी मेणबत्ती लावून अभिवादन केले. तसेच, इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली या वेळी ५०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या साठी डॉ,नलिनी शिंदे, शरद शिंदे, शेखर सोळंके यांचे अनमोल सहकार्य लाभले. महापरिनिर्वाण दिन विषयी विनय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले. नीलिमा भारंबे, उज्वला ब्रम्हणकर, सुदर्शन पाटील, मयुर धनगर, रवी शिंदे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सोनल गवळी यांनी केलेसौ.कल्पना वसाने यांनी आभार मानले. हा कार्यक्रम संस्था अध्यक्ष तथा ग. स. सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल, सविता ठाकरे यांनी केले.