<
जळगाव-(प्रतिनिधी)-येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित रक्तपेढी यांना राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य, मुंबई या विभागाकडून लाखोंचे अनुदान मिळत असून देखील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचालित रक्तपेढी ला माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ का लागू नाही हे मात्र विशेषच म्हणावे लागेल. इंडियन रेड क्रॉस सोसायटी का म्हणून माहिती लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असेल हा प्रश्न कायम गुलदस्त्यात आहे. या इंडियन रेड क्रॉस सोसायटी मध्ये कुठल्याच प्रकारची माहिती हि माहिती अधिकार कायद्यांवये देण्यात येत नाही.
जळगाव येथील माहिती अधिकार प्रशिक्षक व कायकर्ते दीपक सपकाळे यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित रक्तपेढी जळगाव यांच्याकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली होती परंतु त्यांनी माहिती अधिकार लागू नसल्याबाबतचे खुलासा पत्र देऊन माहितीच्या अधिकाराची पायमल्ली केली आहे.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी कडून कोणतीही माहिती मिळत नसल्याने दीपक सपकाळे यांनी राज्य रक्त संक्रमण परिषद (महाराष्ट्र राज्य) मुंबई यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ या नुसार अर्ज करून इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित रक्तपेढी जळगाव यांना मिळत असलेल्या अनुदानाबाबत दिनांक ०९/०४/२०१९ रोजी माहिती मागितली होती. त्यानंतर तब्बल ६ महिन्यानंतर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर माहिती बघून निदर्शनांत येते कि राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून लाखोंच्या घरात अनुदान देण्यात येत असते. तसेच धर्मदाय संस्था असल्याने शासनाकडून अनुदान घ्यायचे आणि शासनाने निर्गमित केलेले माहिती अधिकार कायद्यांचे उल्लन्घन करायचे हे कितपत योग्य आहे असा देखील सवाल निर्माण होत आहे.
सदर रक्तपेढीला शासकीय अनुदान प्राप्त होत असून देखील माहिती च्या अधिकाराखाली माहिती देत नसल्याने नेमकं काय दडलंय या रक्तपेढीच्या माहिती मध्ये याकडे अनेक सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.