<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथिल लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने जागतिक एड्स दिन पंधरवाडा निमित्ताने जिल्हा एडस् प्रतिबंधक व नियंत्रण विभाग,सामान्य रूग्णालय,जळगाव याचे संयुक्त विद्यमाने एडस् मार्गदर्शन कार्यक्रम, पोस्टर प्रदर्शन तसेच रांगोळी स्पर्धैचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डाँ. वाय.जी.महाजन होते . प्रमुख पाहुणे म्हणून समुपदेशक श्रीमती रुपाली दिक्षीत,मनिषा वानखेडे, दिपाली पाटील , प्रशांत पाटील व इतर उपस्थित होते. त्याचे समवेत रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. नितीन बडगुजर, डॉ. भारती गायकवाड, प्रा निलेश चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रा.डॉ. नितीन बडगुजर यांनी प्रास्ताविक सादर करताना रेड रिबन क्लब अंतर्गत कार्यक्रमाचा आढावा घेतला व कार्यक्रमाची रुपरेषा मांडली.यानंतर समुपदेशक रुपाली दिक्षीत यांनी एच. आय. व्ही. एडस् बाबतचा इतिहास व सद्यस्थिती मांडली, सौ.मनिषा वानखेडे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना व भमिका विशद केली. दिपाली पाटील, प्रशांत पाटील यांनी आय.सी.टी.सी व ए.आर.टी.बद्दल तर सौ बागुल यांनी गुप्तरोग व घ्यावयाची काळजी याबद्दल सखोल माहिती दिली. यानंतर कार्यक्रम अधिकारी डॉ. नितीन बडगुजर यांनी एडस् प्रतिबंध आणि निर्मुलन साठी सामुहीक शपथ उपस्थितांना दिली.याप्रसंगी प्रोजेक्टर द्वारा श्री.तुकाराम मुंडे , संचालक महाराष्ट्र राज्य एडस् प्रतिबंधक व नियंत्रण मंडळ यांचा संदेश दाखविण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शंकाचे समाधान करण्यात आले कायक्रमाचे अध्यक्ष डॉ वाय.जी.महाजन यांनी अध्यक्षीय मनोगत सादर केले.
संपूर्ण कायक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.निलेश चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डाँ. भारती गायकवाड यांनी केले यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक उपस्थित होते.