<
आरटीओ विभागाकडून सहकार्याची अपेक्षा पत्रकार परिषदेत दिली माहिती
जळगांव(प्रतिनीधी)- भारत सरकारने परिवहन विभागांतर्गत जे नवीन ॲप आणलेले आहे, भारतामध्ये डिजिटल इंडियाच्या नावावर काम होत आहे, परंतु डिजिटल डिजिटल काम ज्याप्रमाणे पाहिजे तसे होत नाही त्यामुळे अधिकारी व कर्मचारी जनतेची दिशाभूल करून त्यामध्ये ९० टक्के लोकांची आर्थिक लूट करून फसवणूक होत असल्याचे आज पत्रकार परिषदेत भारतीय वाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या दरम्यान आरटीओकडून वारंवार येणाऱ्या अडचणी चा देखील त्यांनी तक्रारींबद्दल खरेदी-विक्री एजंट व डीलर या लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सुद्धा त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये आर टी ओ ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटला लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आर टी ओ याऑफिस मध्ये होणारा भ्रष्टाचार कमी व्हावा. महाराष्ट्रातील सर्व आर टी ओ कार्यालयांमध्ये वाहन खरेदी-विक्री करताना, नोंदणी करताना लागणाऱ्या शासकीय दर पत्रक कार्यालयाच्या बाहेर मराठी मध्ये लिहिले जावे. ज्या चार चाकी वाहनांसाठी पासिंग साठी दोन हजार रुपये लागतात त्याच ठिकाणी दहा ते पंधरा हजाराचा भुर्दंड सोसावा लागत आहे यापासून सुद्धा सुटका व्हावी. जुन्या गाड्यांची इंडस्ट्री ही फार मोठी असून गाड्यांच्या खरेदी-विक्रीमध्ये ७३ टक्के गाड्या जुन्या वाहन खरेदी विक्रीमधून होत असतात. यामध्ये भारत सरकारच्या फायनान्स इंडस्ट्रीजला देखील मोठा फायदा खरेदी-विक्री करताना फायनान्स च्या माध्यमातून होतं आहे. व्यवसाय कर, पर्यावरण कर या वेगवेगळ्या नावावरती पैशाची मागणी केली जाते. परंतु त्याच्या पावत्या देखील मिळत नाही असे देखील सांगितले. यासर्व मागण्या संदर्भात जळगाव आरटीओ कार्यालयात पत्र देऊन १४ऑगस्ट रोजी मागणी केली होती त्या मागणीचे आत्ता पर्यंत कुठलीही दखल जळगाव परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. आमच्या अशा प्रकारच्या मागण्या संदर्भात आज भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ भाई व जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेले असता , बिफोर मि या प्रकाराबद्दल बाबत जळगाव आरटीओ यांनी आपल्या मर्जीप्रमाणे वाहन खरेदी धारक समक्ष असावेत असा कायदा आणून त्रास दिला जात आहे. महाराष्ट्रात असा कुठलाही नियम नसताना फक्त जळगाव आरटीओ कार्यालयात हा नियम आहे याबाबत त्यांना निवेदन देण्यास गेली असता त्यांना सुद्धा व्यवस्थित वागणूक जळगाव परिवहन विभागाचे अधिकारी यांनी दिली नाही. असे देखील त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले जर का आमच्या मागण्या मान्य नाही, तर आम्ही मुंबईला मंत्रालयावर भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेमार्फत मोर्चा आणून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यास सुद्धा तयार आहे. असे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पत्रपरिषदेत बोलून दाखवले. यावेळी भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम बजाज, विनायक तारू, विजय ओव्हाळ, सुनील गंगावणे, महाराष्ट्र खजिनदार निलेश अजमेरा, शहराध्यक्ष हर्षल मावळे हे पत्रकार परिषदेस उपस्थित होते.