<
जळगाव(प्रतिनिधि)- नविन्य उपक्रम म्हणून प्रत्येक वर्षी प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव हे वर्गाचे हस्तलिखित तयार करत असतात. यात ते विद्यार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग घेऊन या हस्तलिखिताची निर्मिति करून घेत असतात. या वर्षीचे हस्तलिखित विश्वाचे अंतरंग यात सूर्यमाला, ग्रह, उपग्रह, अवकाशातील खगोल, तारकासमुह, तेजोमेघ, नक्षत्र अशा विविध संकल्पनाचा समावेश यात करण्यात आला असून. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल हा हेतु साध्य करण्याचा प्रयत्न या द्वारे करण्याचा मानस आहे. या हस्तलिखितात विद्यार्थ्यांना विविध संकल्पनाविषयी पायाभूत माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे हस्तलिखित विद्यार्थी व शिक्षक निर्मित असून या हस्तलिखिताची निर्मितितुन विद्यार्थ्यांना ज्ञानर्जनाचा आंनद झाला. या हस्तलिखिताचे प्रकाशन प्रगती माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटिल व प्रगती बालवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गौरी दिक्षित, रमेश ससाने, पंकज नन्नवरे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.