<
जळगांव(प्रतिनीधी)- छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी)पुणे, महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण या विभागाची सवयत्ता संस्था या संस्थेअंतर्गत समाजातील ज्वलन्त विषयावर समाजप्रभोधन करणे व मराठा – कुणबी, कुणबी – मराठा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी, पीएचडी, एम पी एल, फेलोशिप, स्किल डेव्हलपमेंट, आदी उपक्रम राबविले जातात. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मा. डी. आर. परिहार साहेब आणि मुख्य प्रकल्प संचालक मा. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र भर सारथी संस्थेचे कामं चालु आहे. या संस्थेचे उद्देश समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा. तरीही सारथी पुणे च्या तारादुत प्रकल्पांतर्गत तारादुत हेमांगी किशोर टोकेकर यांनी दिनांक १३ रोजी पुष्पावती गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालयात इयत्ता ८, ९, १० वि च्या मुलींना “किशोरवयीन मुली समोरील आव्हाने आणि घ्यावयाची जबाबदारी आणि काळजी” ( मुलगी वयात येतांना) या विषयावर प्रबोधन करण्यात आले. यावेळेस मुलींना आपल्या मनात असलेल्या मासिक पाळी संदर्भात अंधश्रद्धा, प्रश्न, तसेच लैंगिग प्रश्न व गैरसमज विचारलात या बद्दल मुलींना वेज्ञानिक माहिती सांगून त्यांच्या मनातील शंकाचे निरसन केले. या विषयावर प्रभोधन कार्यक्रम घेण्याचा उद्देश वारंवार होणारे निर्भया व उन्नाव घटना, या घटना घडूच नये म्हणून प्रतिबंधात्मक म्हणून किशोरवयीन मुली व मुलांना योग्य ते लैंगिग मार्गदर्शन मिळावे. यासाठी हेमांगी किशोर टोकेकर यांनी मुलींना प्रबोधन केले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास सकारत्मक प्रतिसाद दिला. तसेच या कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन सहाय्यक प्रकल्प संचालक मा. प्रदीप खरे व प्रकल्प अधिकारी मा. नीता पाटील यांचे लाभले