<
जळगांव(प्रतिनीधी)- आजही तोच आक्रोश,तोच आकांत जीवाची लाही लाही करणारा आणि माणसाला माणुसकी शुन्य बनवणारा ..! काय चाललय हे ? काय आहे हे? एवढं अमानुष्य कोण कस वागू शकत ?विचार केला तर डोक्याचा भुगा होतो आणि संतापाची लाही पेटते आणि भरपूर शब्द फुटतात मन पुतपुटते; काही दिवस सोशल मिडियावर खेद संताप व्यक्त केला जातो आणि काहि दिवसातच विसरली जाते ती घटना आणि शांत होते ती लाही अस्वस्थ करणारी.आणि पुन्हा आपण आपल्या पद्धतीने जीवन जगायला मोकळे होतो. पण नक्कीच पुन्हा आम्ही पेटून उठुच पण जेव्हा आणखी असली मनुष्याला लाजवेल अशी घटना घडेल तेव्हा तोपर्यन्त आम्हाला झोप खुप प्रिय हो सज्जन असल्याची. कसला असा दिवस उगावतो आणि असली घटना घडते. सर्व देशभरात पोहचते आणि तेवढ्याचं जलद गतीने शांतही होते. पण त्या निर्भयाचा विचार केला का कोणी? आज खर आपली माता-बहिण-मुलगी सुरक्षित आहे का? यासाठी काही कराव लागेल का? याचा विचार कोणी करणार आहे का? आताच घडलेल प्रकरण बघा हैद्राबादच डॉक्टर असलेली युवती निरपराध अशी; मनुष्यालाही लाजवेल अस कृत्य करून डायरेक्ट जाळून टाकने एखाद्या नराधमालाही लाजवेल अस कृत्य करने. मनुष्याला नशोभनारी ही गोष्ट आणि ही काहि एकच घटना नाही अशा अनेक घटना कानावर येत असतातच अशा कित्येक निर्भया या त्या अमानुष परिस्थितीतून जात असतील काय म्हणाव यांना खर काही सूचत नाही. आणि ही बातमी कानावर येताच पायातली सनक डोक्यात बसली आणि क्षणातच डोळ्यासमोर चेहरा आला तो आपल्या माता-बहिण-मूलगीचा मनात तीव्र अशी धड़की भरली कारण असला अमानुष्कीचा बाजार बघुन हिम्मतच खचली. डोक्यावर एकामागोमाग एक प्रश्नांचे घन बसावे अस सुन्न वाटायला लागले.असाच विचार करताना त्या महिलांचाही मनात विचार आला की ज्या महिलांवर अशी परिस्थिती येत असेल किंवा ज्या महिला बाहेरगावी शिक्षणासाठी, कामासाठी आहेत त्यांच्या मनात ही धड़की किती तीव्र प्रमाणात व कशापद्धतीने भरली गेली असेल. आपण त्यांच्या तीव्रतेची जाणीव पण करू शकत नाही.संध्याकाळी-रात्रि कामानिमित्त घराबाहेर गेलेली महिला तिच्या मनाची स्थिति काय असेल याची जाणीव करणे आपल्याला शक्य होणार नाही.ती घरी केव्हा पोहचेल याच विचारात आणि त्याच धास्तिने घरचा रस्ता बघत असेल.तिकडे घरचे पण तिला घरी यायला वेळ झाला असेल तर विचारात आणि धास्तितच रस्त्याच्या वाटेने वाट बघत बसत असतील.कुठे राहिली ही? काही झाल तर नसेल ना? हे प्रश्न जोपर्यत्न ती घरी येत नसेल तोपर्यन्त मन जेरिस आणून सोडत असतील. आज हे सर्व समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो…की, एखादी एकटी असलेली महिला-स्त्री आपली मालकीची संपत्ति नसून ती एक आपली जबाबदारी आहे.ती ही कुणाची माता बहिण कुणाच्या तरी घरातील बाळगणार पाखरू आहे.आणि जेव्हा हे आपण खऱ्या अर्थाने समजु आणि खऱ्या अर्थाने जेव्हा आपण ही आपली जबाबदारी पूर्ण तन्मयतेने पार पाडु तेव्हा एका नविन भारताचे नविन चित्र आपल्यासमोर उमटेल आणि जगात आपल्या देशाचे एक नावलौकिक होईल.आणि समाजापुढे एक नविन आदर्श प्रस्थापित होईल.
मनोज भालेराव (शिक्षक)प्रगती विद्यामंदिर, जळगाव