<
पाचोरा(प्रमोद सोनवणे)- तालुक्यातील बांबरुड रा. येथील प्रयोगशील युवा शेतकरी मयुर वाघ यांनी मजुर उपलब्ध होत नाही म्हणून आज त्यांच्या शेतावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने दोन मजुर लावुन आज या जुगाड यंत्राचा वापर करुण रब्बी मक्याची लागवड केली. आजच्या काळात पारंपारिक शेती करण्यापेक्षा आधुनिक शेती ही जरूरी आहे. कारण निसर्गाचे संतुलन आता बदलत चालले आहे. त्याचबरोबर शेतीसाठी मजूर मिळणे सुद्धा कठीण झाले आहे म्हणून आपण शेतीतून काही नवीन करता येईल का याचा बांबरुड (राणीचे) येथील प्रयोगशील शेतकरी ज्यांना आदर्श शेतकरी म्हणून असंख्य पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांनी एक नवीन प्रयत्न करुण एक नवीन मका लागवड जुगाड यंत्र शोधले आहे. यांनी हायटेक मका या वाणाची लागवड केली.