<
21 व 22 रोजी राज्यातील 500 तज्ञ डॉक्टर येणार
जळगाव: शहरात प्रथमच राज्यस्तरीय युवा अमॉग्स स्त्री रोग तज्ञांची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत राज्यातील 500 नामवंत डॉक्टर हजेरी लावणार असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुजाता महाजन यांनी सांगितली. कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याहस्ते होणार आहे.
ही कार्यशाळा हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज रेस्टॉरंट मध्ये 21 व 22 रोजी होणार आहे. यासाठी शहरातील डॉक्टरांची विविध समित्यांवर निवड करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली.
युवा डॉक्टरांना होणार फाय
युवा अमॉग्स कार्यशाळेमुळे युवा डॉक्टरांना मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यशाळेत राज्यातून तज्ञ अनुभवी डॉक्टर हजेरी लावणार असल्याने ज्ञानाचे आदान-प्रदान होण्यास मदत मिळणार आहे. तसेच या कार्यशाळेत अॅडोलेसेंट गायानाकोलॉजी, फोएटाल, मेडिसिन, या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. याचा फायदा वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना, तसेच नवीन युवा डॉक्टरांना फायदा होणार आहे.
राज्यातून 500 डॉक्टरांनी केली नोंदणी
या युवा अमॉग्स कार्यशाळेसाठी राज्यातून 500 डॉक्टरांनी नोंदणी केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, चंद्रपूर, यवतमाळ, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, अकोला, या जिल्ह्यातून डॉक्टर येणार राज्यातील आतापर्यंत 500 डॉक्टरांनी या अमॉग्स कार्यशाळेसाठी नोंदणी केली असल्याची माहिती यावेळी सांगण्यात आली. तसेच कार्यशाळेत नवीन शोध निबंध, न्यूज अॅडव्हान्स इन गायनकॉलॉजी अँड ऑब्सस्टीक्स, चर्चा, प्रश्नोत्तरे, पेपर पोष्टर प्रेझेन्टेशन सादर होणार आहे. वैशाली सामंतांच्या आर्केष्टा शो चे आयोजन वैशाली सामंतांच्या आर्केष्टा शो चे आयोजन डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजकडून आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या कार्यशाळेसाठी शहरातील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे.