<
वाहतूक पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत ३४४ जणांवर गुन्हा दाखल
पुणे(अमोल परदेशी)- यापूर्वी नो एन्ट्री मधून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलीस दंड आकारत होते मात्र आता थेट गुन्हा दाखल करून त्याला अटक केली जात आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याचा उल्लेख संबंधित वाहनचालकाच्या चारित्र्य पडताळणी च्या अहवालात होणार आहे यामुळे या वाहनचालकांना पासपोर्ट मिळवणे तसेच पोलिसांकडून विदेशी शिक्षणासाठी नोकरीसाठी आवश्यक असलेला दाखला मिळवताना अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याचे वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिसांनी सांगितले. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला दररोज किमान पाच जणांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कलम २७९ अंतर्गत दाखल केला जाणारा हा गुन्हा जामीनपात्र असल्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींची जामीनावर ती मुक्तता होऊ शकते मात्र नंतरच्या सव्य अपसव्य भानगडी सांभाळत बसाव्या लागतील. परदेशात जाऊन ब्राईट फ्युचर ची स्वप्ने रंगवणाऱ्या तरुण पिढीने या नियमाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.