<
अनुभूती स्कुलच्या ‘एड्युफेअर 2019’ चे कागदी विमान उडवून अनोखे उद्घाटन
जळगाव दि.२० (प्रतिनिधी) – दैनंदिन जीवनात विज्ञानाचा उपयोग आणि हसत खेळत शिक्षण या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले ‘एड्युफेअर-२०१९’ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी व्यक्त केला. त्यांच्यासह जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्यात. दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे इंग्रजी माध्यमातून मोफत मिळावे हे भवरलालजी जैन यांचे व्हिजन होते. विज्ञानासोबतचे शिक्षण त्यांच्या भावी उत्कर्षाचा केंद्रबिंदू ठरत आहे. असे सांगत शिक्षणासोबतच आनंद घ्या, या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अबालवृद्धांनी एड्युफेअरला भेट द्यावी असे यावेळी ते म्हणाले. अनुभूती इंग्लिश मिडियम स्कुल प्रायमरी व सेकंडरी च्या विद्यार्थ्यांनी साकारलेला ‘एड्युफेअर-2019’ चे खान्देश सेंट्रल मॉलच्या भव्य लॉनवर आकर्षक, रंगीत कागदी विमाने उडवून मान्यवरांच्याहस्ते औपचारीक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, सेवादास दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. सुभाष चौधरी, डॉ. शेखर रायसोनी, बांधकाम व्यावसायीक अनिश शहा, आनंद गुप्ते, सौ. ज्योती जैन, अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेन्सीयल स्कुलचे प्राचार्य जे. पी. राव, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रायमरी व सेकंडरीच्या प्राचार्या रश्मी लाहोटी उपस्थित होते.
एड्युफेअरमध्ये मान्यवर रमले
कुतूहल क्षमता वाढवणारे, वैज्ञानिक-गणितीयदृष्टीने संशोधक निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अनुभूती स्कुलतर्फे दर दोन वर्षानंतर एड्युफेअर या शैक्षणिक जत्रेचे आयोजन केले जाते. या जत्रेत विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले विविध वैज्ञानिक, बौद्धीक खेळ ठेवण्यात आलेले आहेत. या विविध खेळांचा समावेश असलेल्या स्टॉल्समध्ये सर्व मान्यवर आपले बालपण आठवून त्यात रमले. प्रत्येक स्टॉलची माहिती त्यांनी जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी आपल्या स्टॉलचे उत्कृष्ट संभाषणाद्वारे माहिती दिली.
एड्युफेअर ला भेट देण्याचे आवाहन
गेल्या दोन वर्षांपासून शहरातील सर्व शाळांना, पालकांना देखील ही यात्रा अनुभवता यावी यासाठी या एड्युफेअरला व्यापक स्वरूप देण्यात आलेले आहे. यावर्षी विद्यार्थी व पालकांच्या आग्रहाखातर खान्देश सेंट्रल मॉलच्या भव्य अशा हिरवळीवर हा कार्यक्रम होत आहे. दि. २२ डिसेंबर पर्यंत दुपारी ३ ते रात्री ९ वाजेदरम्यान एड्युफेअर ला भेट देता येईल.