<
जळगाव-(प्रतिनिधी)-मागील दोन वर्षापासून राज्यातीलहिवाळी उन्हाळी पावसाळी अधिवेशनापासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे समग्र शिक्षा अभियानांतर्गत पटसंख्येनुसार निधीत वाढ करून राज्य शासनाने मागणीची दखल घेतली असल्याचे प्रतिपादन राज्यातील हाडोती शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या राज्य अध्यक्षांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.येथून पुढे विद्यार्थी संख्येनुसार म्हणजेच पटसंख्येनुसार शाळांना अनुदान मिळणार असूनशाळेचा पट (१) १ते१५..१०००० रुपये (२)१६ ते१०० ..२५०००रूपये(३)१०१ ते२५० ..५००००(४)२५१ते१०००..७५००० रुपये (५)१००१ ते पुढे ..१०००००असे अनुदान सन २०१९.२०२० या वर्षा साठी असणार आहे राज्य समन्वय समितीचेराज्याध्यक्ष अर्जुन राव साळवे बाबुराव पवार व राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझर कर अर्जुन राव कोळी अरुणराव जाधव इलाहिला उद्दीन फारुकीयांनी राज्य अधिवेशनापासून राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे व राज्यनेते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार व राज्य मंत्रिमंडळातील कार्यकारिणीच्या समर्थ साथीमुळे या लढ्याला यश मिळाले यामुळे मुख्याध्यापकांची शालेय खर्चा साठी होणारी परवड कमी होईल मुख्याध्यापकांशी सऺबधित तसेच राज्यातील प्राथमिक शिक्षक वस्तीशाळा शिक्षक केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक महिला शिक्षक राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक राष्ट्रीय आदर्श शिक्षक यांचे अजूनअजून बरेच प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझर कर यांनी केले आहे