<
जळगांव(प्रतिनीधी)- छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी)पुणे, महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण या विभागाची सवयत्ता संस्था या संस्थेअंतर्गत सारथी पुणे च्या तारादुत प्रकल्पांतर्गत तारादुत हेमांगी किशोर टोकेकर यांनी आज २६ रोजी नुतन मराठा कॉलेज जळगाव येथे कंकणाकृती सूर्यग्रहण निमित्त विद्यार्थ्यांना सोलर गॉगल च्या माध्यमातून सूर्यग्रहण दाखवून सूर्यग्रहण अपशकुन नसुन ते खगोलीय अविष्कार आहे असं सांगितले, तसेच महिला वर्गामध्ये सूर्यग्रहणा बदल ज्या अंधश्रद्धा आहेत त्या बद्दल प्रबोधन आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न व शंकाचे निरसन केले. या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे यांनी सूर्यग्रहणा विषय ची अंधश्रद्धा यावर विध्यार्थीना मार्गदर्शन केले. तसेच मराठी विज्ञान परिषदचे सचिव प्रा. डी. बी. भारंबे यांनी सूर्यग्रहण म्हणजे काय या वर वैज्ञानिक माहिती विद्यार्थ्यांना दिली. या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.