<
जळगांव(प्रतिनीधी)- शहरातील सरस्वती विद्या मंदिरात सर्वांत मोठ्या कालावधीचे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी सोलर गॉगल च्या माध्यमातून घेतला, तसेच सूर्यग्रहण अपशकुन नसुन ते खगोलीय अविष्कार आहे असं यावेळी शिक्षकांनी सांगितले. सुर्यग्रहण बघता यावे यासाठी उज्वला ब्राम्हणकर यांनी विद्यार्थ्यांना सूर्यग्रहणाच्या चष्मा उपलब्ध करून दिला. सूर्यग्रहणा बदल ज्या अंधश्रद्धा आहेत तसेच सुर्यग्रहणाच्या वैज्ञानिक माहिती बद्दल सखोल मार्गदर्शन येथील शिक्षिका सुवर्णलता अडकमोल यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी विद्यार्थ्यांना एक एक करून सूर्यग्रहण बघण्याचा आंनद लुटू दिला. सूर्यग्रहण बघण्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये एक कुतूहल निर्माण झालेला दिसून आला. या प्रसंगी शाळेचे तथा ग स सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वासाने, निलिमा भारंबे, सविता ठाकरे, सुदर्शन पाटील, मयुर खंकर, आदी उपस्थित होते.