<
जळगाव.दि.२० – जिल्ह्यात 23 जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती,30 जुलै रोजीसंत नामदेव महाराज पुण्यतिथी, 31 जुलै रोजी संतसावता माळी पुण्यतिथी आणि1 ऑगस्ट रोजी शाहीरअण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळकपुण्यतिथी इत्यादि जयंती व पुण्यतिथी साजरीहोणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात,तालुक्यात व गावा -गावांमध्ये मिरवणुका, रॅली, प्रतिमा पुजन, पुतळा पुजनअशा विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन केलेजाईल. सदर कार्याक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दीएकवटलेली असते. त्यानंतर आगामी काळात हिन्दुबांधवांचा श्रावण मास सुरू होणार असून विविधस्वरुपांचे सण उत्सव त्या दरम्यान साजरे होणारआहेत. तरी या सर्व जयंती,पुण्यतिथी तसेच सणआणि उत्सवात काही समाजकंटक, जातीय गुंड, समाजात तेढ निर्माणहोईल अशांतता निर्माण होईल अश्या प्रकारचे कृत्य करण्याची शक्यता नाकारता येतनाही ही बाब लक्षात घेता कोणताही अनुचीत प्रकारघडू नये व कायदा व सुवस्था अबाधित राहण्यासाठी संपूर्ण जिल्हाहद्दीत दिनांक 21 जुलै ते 4 ऑगस्ट2019 दरम्यान मुंबई पोलीस अधिनियम 1951 चेकलम 37 (1) (3) कलम जारी करण्यात आले आहे.तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्ह्यातशांतता अबाधित राहण्यासाठी प्रशासनास सहकार्यकरावे असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी वामनकदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.