<
भडगाव (प्रतिनीधी)- येथुन जवळच असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव, संचलीत, “गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव” येथील ११ वी (कला) शाखेत शिकणारी कु.नेहा गोविंद महाले हिने “कुराश असोसिएशन अॉफ इंडिया (भारतीय कुराश महासंघ)” च्या मान्यतेने “कुराश असोसिएशन अॉफ पंजाब” तर्फे आयोजित “राजपुरा, पतियाळा” येथे २३ ते २५ डिसेंबर दरम्यान आयोजित “कॕडेट अॕंड ज्युनीअर कुराश राष्ट्रीय चॕम्पियनशिंप”* स्पर्धेत ४८ कि.ग्रॕ. वजनी गटात कांस्यपदक प्राप्त केले आहे.
बाद पध्दतीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना कु.नेहाने जम्मु-काश्मीर तसेच मध्य प्रदेशच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन उपांत्यफेरीत प्रवेश मिळवत तिला सुवर्णपदक विजेत्या दिल्लीच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला आणि तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, विशेष करुन तिचे तीनही सामने एकाच दिवशी पार पडले त्यात पंजाबमधील प्रचंड अशा थंडीच्या वातावरणातही प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कु.नेहाने हे घवघवीत यश मिळऊन महाराष्ट्राच्या पदक तालिकेत वाढ केली आहे. कु.नेहाच्या उल्लेखनीय कामगिरीने संस्थेच्या तसेच महाविद्यालयाच्या यशात अजून एक मानाचा तुरा तिने चढवला आहे.
कु.नेहास अहमदनगर येथील श्रीमती सोनाली साबळे ह्या प्रशिक्षक म्हणून लाभल्या तर बी.डी.साळुंखे,आर.एस.कुंभार व प्रेमचंद चौधरी यांचे तिला सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे.
कु.नेहाच्या राष्ट्रीय स्तरावरील ह्या कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, अव्वर सचिव प्रशांत पाटील, संचालिका पुनमताई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक टी. एस. पाटील, प्रभारी पर्यवेक्षक आर. ए. पाटील, किशोर चौधरी, मनोज पवार, माया मराठे, सोनाली सोनवणे, मनेष पाटील आदि प्राध्यापक-प्राध्यापिका तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.