<
नेतृत्व या गुणाची जोपासना होते- मनोज पाटील
जळगांव(प्रतिनीधी)- येथील आव्हाणे शिवारातील श्री समर्थ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा या उद्देशाने परिसरात तात्पुरत्या स्वरूपाचे तंबू टाकून निसर्गाच्या सानिध्यात आयोजित एक दिवसीय स्काऊट गाईड शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांच दर्शन यावेळी आव्हाणे शिवाराच्या मैदानावर बघायला मिळाले. चार भिंतींच्या आत खेळ न खेळता बाहेर, मैदानावर, संघपद्धती हे स्काऊट गाईड चळवळीचे फार मोठे वैशिष्ट आहे. यातूनच नेतृत्व या गुणाची जोपासना होते. असे यावेळी संस्थेचे तथा ग स सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील म्हणाले. सुदृढ समाज निर्माण करण्याचे काम या स्काऊट गाईड शिक्षणातून खात्रीने होते. असेही ते यावेळी म्हणाले. तसेच मुलांमध्ये सकाळ पासून तंबू उभा करण्यासाठी एक प्रकारची चुरस झाली आणि छान पध्दतीने सजावट देखील केली. दुपार सत्रात ज्योती पवार यांचे मार्गदर्शन लाभले. नतंर शिवाजीनगर येथे हनुमान मंदिराची व परिसरातील स्वच्छता करुन साक्षरता रँली काढून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. शेवटी शेकोटी चा देखील उपक्रम याठिकाणी करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील व संस्थेच्या संचालिका प्रतिक्षा पाटील, संदिप पाटील, वनराज पाटील, राजीव पाटील, हर्षाली पाटील, वैशाली शिंदे व पालक उपस्थित होते. अशा शिबीरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार होऊन तो एक उत्तम व सामाजिक जाणीव असणारा जबाबदार नागरिक बनतो, असे संस्थेच्या संचालिका प्रतिक्षा पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले. तसेच शिबीरा मध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. यासाठी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.