<
जळगाव दि.२०- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे माहितीचा महापूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञान कसे वापरावे हे सामाजिक भान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल यांनी जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या कार्यक्रमात बोलताना केले.
मू.जे. महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग व शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रभावी जनसंपर्क व त्याचे आयाम” या विषयावर के सी ई सोसयटी व मू.जे.महाविद्यालय यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिम्मित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना बागुल म्हाणाले कि, आधुनिक काळात लोककल्याणकारी राज्यासाठी जनसंपर्क जनसंपर्क हा अत्यंत महत्त्वाचा भाग ठरला आहे. प्रशासकीय, राजकीय, व्यवसायिक , सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात जनसंपर्क हा अतिशय गरजेचा ठरवा आहे. लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून माहिती आणि विचारांचे आदान-प्रदान करणे हे जरी गरजेचे असले तरी समाजात वावरताना ज्ञानासोबत परिस्थितीनुरूप भान असणे देखील तितकेच महत्वाचे आहे .प्रभावी जनसंपर्काचा हा मुख्य स्त्रोत आहे.हे विसरता कामा नये. स्वतःचे विचार मांडण्यासाठी आज सोशल मिडियासारखे प्रगल्भ व्यासपीठ उपल्ब्ध झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे माहिती ही कोणाचीही मक्तेदारी राहिलेली नाही. मात्र यातून कमाल आणि किमान ज्ञान कोणते आणि ते कसे घ्यावे हे देखील तितकेच गरजेचे आहे. सध्या शैक्षणिक दृष्ट्या मोठी गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या तरुणांची संख्या वाढली असली तरी प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाचा अभाव असल्याने करियरच्या संधी आजचा युवकाला गवसत नाही .सोशल मिडिया हाताळताना तसेच अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देत जगात काय घडते आहे याची सखोल व खडा -खडा माहिती आजच्या युवकाला असल्यास तो करियर ची संधी स्वतःसाठी निर्माण करू शकतो .असे विचार त्यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना मांडले. यावेळी के.सी.ई.सोसायटीचे सहसचिव अँड.पी.एन.पाटील ,प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, के.सी.ई.चे अँकेडमिक डायरेक्टर दिलीप हुंडीवाले,शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य ए.आर.राणे,आँटोनॉमस इंचार्ज डॉ.एस.एन.भारंबे ,विभागप्रमुख संदीप केदार ,सुभाष तळेले ,जैन इरिगेशन च्या जनसंपर्क विभागातील किशोर कुलकर्णी तसेच प्रा.शमा सराफ, के.जी.कुलकर्णी तसेच सौ. नीता बागुल,प्रा.प्रशांत सोनवणे ,प्रा.केतकी सोनार ,विद्यार्थी ,शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .प्रास्ताविक प्राचार्य उदय कुलकर्णी ,सुत्रसंचालन अपूर्वा वाणी,मान्यवरांचा परिचय विभागप्रमुख प्रा.संदीप केदार व आभार ए.आर.राणे यांनी मानले.