<
जळगाव-(जिमाका) – महिला व बालकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती तसेच यापुर्वी घडलेल्या निर्भया अत्याचार प्रकरण आणि मागिल काही दिवसापूर्वी तेलंगना बलात्कार प्रकरणा सारख्या घटनांचा विचार करता महिला व बालकांना त्यांच्यावरील होणाऱे सायबर गुन्हे व अत्याचाराबाबत त्यांच्यामध्ये जागरुकता व सतर्कता निर्माण होवून त्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरुध्द योग्य प्रकारे दाद मागता यावी यासाठी त्यांना असलेले कायद्याचे संरक्षणाबाबत त्यांना या कार्यक्रमात माहिती देण्यात येणार आहे. तरी महिला व बालकांवरील होणाऱ्या सायबर गुन्हे व अत्याचाराबाबत जागरुकता या विषयावर 03 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिली महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस उप निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, जळगाव अंगत नेमाणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.