Monday, May 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नागरीकांनी शिधापत्रिकेसाठी निर्धारित दराप्रमाणेच रक्कम भरावी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नागरीकांनी शिधापत्रिकेसाठी निर्धारित दराप्रमाणेच रक्कम भरावी

चाळीसगाव-(जिमाका) – नागरिकांसाठी   तहसीलस्तरावर नवीन पिवळी, केशरी व शुभ्र (पांढरे) याप्रमाणे शिधापत्रिका पुरविण्यात येतात. शिधापत्रिका मिळण्यासाठी शासकीय फी चे दर निश्चित करण्यात आले आहेत. नागरीकांनी  शासनाने निर्धारित केलेल्या  रकमेपेक्षा जादा रक्कम देण्याची आवश्यकता नाही. असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. स्वस्त धान्य दुकानदार यांना कळविण्यात येते की, कोणत्याही स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणीसाठी किंवा अहवाल पाठविण्यासाठी आपल्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांना पैसे देऊ नये. कोणी आपल्याकडे पैशांची मागणी केल्यास त्याची तक्रार तात्काळ लाचलुचपत प्रतिबंध विभाग (ए.सी.बी.) जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडे करावी. तसेच वरिष्ठ अधिकारी यांचे नावाखाली दुकानदार यांचेकडून कोणी रक्कम गोळा करीत असल्यास अशा बेकायदेशीर कामाशी जिल्हा पुरवठा कार्यालयाचा काही एक संबंध नसल्याचेही श्री. सुर्यवंशी यांनी कळविले आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सर्व तहसीलस्तरावर नवीन पिवळी, केशरी व शुभ्र याप्रमाणे रेशनकार्ड विनामुल्य पुरविण्यात येत आहे. त्याबाबत संबंधित शिधापत्रिकाधारकांना द्यावयाच्या शासकीय फीचा दर नविन शिधापत्रिका पिवळी – रुपये 10, केशरी- रुपये 20, शुभ्र-रुपये 50 आणि दुय्यम शिधापत्रिका पिवळी- रुपये 20, केशरी रुपये 40, शुभ्र रुपये 100 याप्रमाणे निश्चित करुन दिलेला आहे. तर प्रत्येक शिधापत्रिका मिळविण्यासाठी संबंधित विभागाकडे करावयाच्या छपील अर्जासाठी 2 रुपये या शासन निर्णयाद्वारे दर निश्चित करुन दिलेले आहे. तरी  पात्र शिधापत्रिकाधारकांनी, लाभार्थ्यांनी किंवा स्वस्त धान्य दुकानदार यांनी पुरवठा विभागातील कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांना रक्कम देण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात 3 जानेवारी रोजी महिला व बालकांवरील अत्याचाराबाबत जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

शकुंतला विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

शकुंतला विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d