<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील सरस्वती विद्या मंदिरात शिक्षणा पासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या व अडाणीपनाच्या अंधकार नाकारून ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनवणाऱ्या, भारतीय स्त्री शिक्षणाची जननी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले च्या प्रतिमेला मुख्याध्यापिका कल्पना वसाणे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी त्यांचा कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.या प्रसंगी चिमुकल्या विद्यार्थिनींनी सावित्री बाई फुलेंची वेशभूषा करून भाषणांमधून मी सावित्री बाई फुले बोलतेय या वाक्याने सर्वांची मने जिंकून घेतली. तसेच मुलांनी देखील भाषणांमधून स्त्री चे महत्व सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा ग. स. सोसायटी चे अध्यक्ष मनोज पाटील यांनी भारतीय पहिली महिला शिक्षिका सावित्री बाई फुले बद्दल मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाचे नियोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले. तर सहकार्य नीलिमा भारंबे, उज्वला ब्रम्हणकर, सुदर्शन पाटील, मयुर कणखर यांचे लाभले.