<
भडगाव(प्रतिनीधी)- येथून जवळच असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगांव संचलीत गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव येथे विशाखा समिती तर्फे “सहजयोग व ध्यानधारणा” ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम श्री.निर्मलादेवी प्रणीत सहजयोग, भडगाव समिती च्या सहकार्याने तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रचंड अशा उत्साहाने संपन्न झाला. सदर कार्यक्रम सुरु होण्याआधी महाविद्यालयीन तरुणींसाठी विशाखा समितीने “ध्यानधारणा व योगासने” ह्या विषयावर सौ.स्मिता ठाकूर यांचे व्याख्यान पार पडले, ह्या व्याख्यानादरम्यान निर्मला वेळीस्कर यांचेही मार्गदर्शन विद्यार्थिनींना प्राप्त झाले. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी महाविद्यालयातील विशाखा समितीचे सदस्या प्रा.सोनाली सोनवणे, प्रा.माया मराठे, प्रा.प्रविणा पाटील, प्रा.प्रतिभा केदार, प्रा.मनिषा बोरसे आदिंनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माया मराठे यांनी केले, सुत्रसंचालन सोनाली सोनवणे तर आभार प्रविणा पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होणेसाठी प्राचार्य आर.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.