<
भडगाव(प्रतिनीधी)- येथुन जवळच असलेल्या क. ता. ह. रा. पा. कि.शि.सं.भडगाव, संचलीत गो. पु. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव, येथे स्रियांसाठी शिक्षणाची कैवाडं उघडून ज्ञानाच्या गंगोत्रीची निर्मिती करणाऱ्या थोर समाजसुधारक, स्री क्रांतिकारक तसेच स्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या “सावित्रीबाई फुले” यांची १८९ वी जयंती विद्यार्थांच्या उत्स्फुर्त अशा प्रतिसादाने उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रा. सोनाली सोनवणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या प्रतिमेस श्रीफळ, पुष्पहार अर्पण तसेच पुजन करुन करण्यात आली. महाविद्यालयातील कल्याणी भोकरे, तेजल पाटील, दिनेश सुर्यवंशी, कोमल जगताप, समाधान खैरनार, भुषण सरदार, प्रियंका पाटील, स्वाती पाटील, जयश्री पाटील, अश्विनी पाटील, अर्पणा मराठे, प्राजक्ता जोशी, गौरव धनगर, प्रशांत महाजन, पुनम चौधरी आदी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सावित्रीबाईं फुलेंवर आपले अनमोल विचार व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत प्रा. सोनाली सोनवणे यांनी केले. व्यासपीठावर प्रा.आर.ए.पाटील, प्रा.किशोर चौधरी, प्रा.मनेष पाटील, प्रा. डी. पी. भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी. वाय. बोरसे यांनी केले तर आभार प्रा. एम. ए. पवार यांनी मानले. कार्यक्रम प्राचार्य आर. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी होणेसाठी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.