<
१८९ वी जयंतीनिमित्त दिला सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा
जळगांव(प्रतिनीधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती महात्मा जोतीराव फुले यांच्या शिक्षणकार्यात व समाजकार्यात सावित्रीबाईनी त्यांच्या बरोबरीने काम केले. त्यांनी जातिभेद केला नाही. स्वत:च्या वाड्यातील आडाचे पाणी त्यांनी दलितांसाठी खुले करुन दिले. अनाथ मुलांंना आईची माया दिली. महात्मा जोतीरावांच्या निधनानंतरही त्यांनी समाजकार्य जोमाने पुढे चालविले अश्या या भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, स्फुर्तीनायिका, ज्ञानाई क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांंच्या जयंती निमित्त धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिवी संचिलत, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगांव येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माल्यार्पण सहयोगी प्राध्यापक डॉ. उमेश वाणी यांच्या हस्ते केले गेले. प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना डॉ. उमेश वाणी यांनी लेखिका डॉ. स्वाती अमराळे – जाधव यांचा ३ जानेवारी २०२० दैनिक तरुण भारत वर्तमान पत्रातील सावित्रीच्या लेकींची आरोग्य साक्षरता वाढण्याची गरज लेखाचा संर्दभ देत स्त्री शिक्षणाचा पायंडा पडुन इतकी वर्ष उलटुनही महिलांच्या शिक्षणाची स्थिती फारशी आशादायक नाही. कोणत्याही भाषेत एक साधे वाक्य वाचता न येऊ शकणाऱ्या १६६ दशलक्ष महिला आज आपल्या देशात आहेत. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये दोन तृतीयांशहून कमी मुली प्राथमिक शिक्षण पूर्ण करू शकतात. केवळ तीनपैकी मुलगी कनिष्ठ माध्यमिक वर्गापर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकते. असे मुलींच्या शिक्षणाच्या स्थितीबाबत जागतिक बँकेने म्हटले आहे. सर्वसमावेशक न्याय्य गुणवत्तेचे शिक्षण आणि सर्वांसाठी आजीवन शिक्षणाची संधी या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयनिश्चितीच्या(२०३० श) मार्गक्रमणात, आपल्या देशातील महिलांच्या शिक्षणाची स्थिती आणि त्या अनुषंगाने त्यांच्या आरोग्याच्या प्रश्ना बद्दल उभय सामाजिक अभियंत्याना कार्य करणे गरजेचे आहे अश्या स्वरुपाचे अवाहन विद्यार्थ्यांना केले. सुत्रसंचलन डॉ. भारती गायकवाड यांनी केले. अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी समवेत प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.