<
साक्षरता अभियान राबविण्यात आले
जळगांव(प्रतिनिधी)- येथील आव्हाने शिवारातील श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षणा पासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या व भारतीय स्त्री शिक्षणाची जननी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून माता पालक देवकाबाई पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. शाळेत साक्षरता अभियान राबविण्यात आले व याबाबत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्यध्यापिका हर्षाली पाटील होते. या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या कार्या बाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमचे सुत्रसंचलन अश्विनी पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन सद्दाम तडवी यांनी मानले. यावेळी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.